राज्यातील १८ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Foto

औरंगाबाद- राज्य पोलिस दलातील १८ पोलिस उप अधीक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्‍तांच्या आज (गुरूवार) बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्या बदलीबाबतचे आदेश गृह विभागाने काढले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासुन काही पोलिस उप अधीक्षक बदलीच्या प्रतिक्षेत होते तर काही जण झालेल्या बदलीच्या ठिकाणी जाण्यास उत्सुक नव्हते. अखेर गुरूवारी बदल्यांबाबतचा आदेश काढण्यात आला आहे.

 

बदली झालेल्या पोलिस उप अधीक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्‍तांचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली आहे हे पुढील प्रमाणे.

 

गणेश गावडे (अप्पर पोलीस अधीक्षक, भोकर, जिल्हा नांदेड (पदोन्‍नतीने पदस्थापनेच्या आदेशाधीन) ते अप्पर पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण), उज्ज्वला बनकर (अप्पर पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ते उप आयुक्‍त, राज्य गुप्‍तवार्ता विभाग, औरंगाबाद), अपर्णा सुधाकर गिते (उप आयुक्‍त, राज्य गुप्‍तवार्ता विभाग, औरंगाबाद-बदली आदेशाधीन ते पोलीस अधीक्षक, नागरी हक्‍क संरक्षण, नांदेड)संजय सांगळे (आर्थिक गुन्हे शाखा, जळगांव ते अप्पर उप आयुक्‍त, राज्य गुप्‍तवार्ता विभाग), राजेंद्र धामनेकर (सहाय्यक आयुक्‍त, नागपूर शहर ते अप्पर उप आयुक्‍त, राज्य गुप्‍तवार्ता विभाग), श्रीकांत मोहिते (राज्य महामार्ग पोलीस, ठाणे ते सहाय्यक आयुक्‍त, पिंपरी-चिंचवड), राहुल मदने (संगमनेर उपविभाग, अहमदनगर-बदली आदेशाधीन ते श्रीरामपूर उपविभाग, अहमदनगर), अशोक थोरात (शिर्डी उपविभाग, अहमदनगर-बदली आदेशाधीन ते संगमनेर उपविभाग, अहमदनगर), सोमनाथ वाघचौरे (श्रीरामपूर उपविभाग, अहमदनगर ते शिर्डी उपविभाग, अहमदनगर), विजय खैरे (पोलिस उप अधीक्षक-मुख्यालय, बुलढाणा ते पोलिस उप अधीक्षक, सायबर सुरक्षा, विशेष पोलिस महानिरीक्षक, सायबर सुरक्षा, मुंबई यांचे कार्यालय), अभय भास्कर देशपांडे (भोकर उपविभाग, नांदेड ते पोलिस उप अधीक्षक (मुख्यालय), जालना), श्रीपाद काळे (अकोला-बदली आदेशाधीन ते नागरी हक्‍क संरक्षण, मुंबई), राजीव मुठाणे (राज्य महामार्ग पोलीस, नागपूर ते पोलीस उप अधीक्षक, एमआयए, पुणे), सुनिल सहदेव गांवकर (राज्य गुप्‍तवार्ता विभाग, मुंबई ते सहाय्यक आयुक्‍त, मुंबई शहर), कृष्णांत पिंगळे (जयसिंगपूर उपविभाग, कोल्हापूर ते इस्लामपूर उपविभाग, सांगली), किशोर काळे (इस्लामपूर उपविभाग, जिल्हा सांगली ते जयसिंगपूर उपविभाग,कोल्हापूर), राजेंद्र मुरलीधर चव्हाण (सहाय्यक पोलिस आयुक्‍त, बृहन्मुंबई ते सहाय्यक पोलीस आयुक्‍त, नवी मुंबई) आणि प्रविण पाटील (नागरी हक्‍क संरक्षण विभाग, अमरावती ते उपविभागीय पोलीस अधिकारी, बोईसर उपविभाग, जिल्हा पालघर)

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker